👉🏾पेरणीपासून ३० ते ४० दिवसांच्या आत तणांचे प्रमाण लक्षात घेऊन एक किंवा दोनवेळा खुरपणी करावी. जरुरीप्रमाणे एक ते दोनवेळा कोळपणी करून जमीन मोकळी करावी. त्यामुळे तणांचे नियंत्रण होते. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
👉🏾पहिली कोळपणी पीक तीन आठवड्यांचे झाल्यावर करावी. कोळपे चालविल्याने जमीन भुसभुशीत होऊन मातीचा थर चांगला बसू शकतो. जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो.
👉🏾आच्छादनासाठी तूरकाठ्यांचा भुसा, धसकटे, वाळलेले गवत, भाताचे काड वापरावे. पीक ४ ते ५ आठवड्यांचे होण्याच्या आत आच्छादनाचा वापर करावा. आच्छादनाचा वापर केल्यामुळे पिकामध्ये २५ ते ३० मिलिमीटर ओलाव्याची बचत होते. पिकास महत्त्वाच्या पाणी देण्याच्या अवस्थेत ओलावा अधिक मिळतो. तसेच जमीन भेगाळण्याची तीव्रता कमी होते.
👉🏾ठिबक/ तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. पाण्याची उपलब्धता असल्यास संरक्षित किंवा पीक जगविण्यासाठी पाणी द्यावे. तुषार पद्धतीने पाणी दिल्यास जास्तीचे क्षेत्र कमी कालावधीत भिजविता येईल.