फर्टीगेशन
जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर केल्यास पिकाच्या गरजेनुसार खते देता येतात. माती परीक्षणानुसार विद्राव्य खतांचा वापर करावा. एखाद्या अन्नद्रव्यांची मात्रा कमी जास्त झाली, तर त्याचा परिणाम लगेच पिकाच्या वाढीवर दिसतो. उदा. हळदीला नत्र घटक जास्त झाल्यास शाकीय वाढ खूप जास्त होते आणि हळद काडावरती जाते. फर्टिगेशन करताना प्रामुख्याने युरिया, फॉस्फरिक ॲसिड किंवा अमोनियम फॉस्फेट आणि पांढरा पोटॅशचा वापर करावा. हळद पिकात फर्टिगेशनची सुरुवात लागवडीनंतर १५ दिवसांनी करावी. जमिनीद्वारे द्यावयाची खतांची मात्रा आणि फर्टिगेशनद्वारे द्यावयाची खतांची मात्रा वेगवेगळी आहे.
हे पण वाचा 👉🏻 हळद बाजारभाव सोमवार 23 डिसेंबर |कृषी उत्पन्न बाजार समिती,वसमत|
💧 हळदीसाठी अन्नद्रव्यांची मात्रा (कि.ग्रॅ./ आठवडा/ एकर)
पीकवाढीची अवस्था लागवडीपासूनचा कालावधी
लागवड ते ते ४ आठवडे (२ समान हप्ते) नत्र ३ स्फुरद ३ पालाश १.५
शाकीय वाढ ५ ते १४ आठवडे (१० समान हप्ते) नत्र ३ स्फुरद ०.९ पालाश ०.६
कंदवाढीची सुरुवात १५ ते २६ आठवडे (१२ समान हप्ते) नत्र १.२५ स्फुरद १.२५ पालाश ०.७५
कंद तयार होण्याची अवस्था २७ ते ३२ आठवडे (६ समान हप्ते) नत्र १.५ स्फुरद १ पालाश २
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. हळद पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱