कसे करावे हरभरा पिकातील घाटे अळी नियंत्रण


🐛घाटे अळी 

घाटे अळी

👉🏽ही कीड हरभऱ्याव्यतिरिक्त तूर, मका, सूर्यफुल, टोमॅटो, भेंडी, करडई, कापूस, ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते. म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये.

👉🏽पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत, जमिनीची खोल नांगरट करावी.

👉🏽एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठया प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो.

   | हे पण वाचा तूर पिकाचे विविध वाण व त्यांचा पक्वता कालावधी |

👉🏽पक्ष्यांना बसण्यासाठी दर १५-२० मीटर अंतरावर काठया रोवाव्यात किंवा मचान बांधावीत. म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळया पकडून खातात.

👉🏽हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी.

👉🏽पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूजन्य कीटकनाशक ५०० मि.लि. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे.

👉🏽किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास, क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.२५ मि.लि. किंवा फ्ल्युबेन्डॅमाईड (४८ एससी) ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

➖➖➖

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती.  हरभरा पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा. 📱📱📱

Post a Comment (0)
Previous Post Next Post