संत्रा-मोसंबी-लिंबू पिकातील बुरशी, अपुऱ्या पोषणामुळे होणाऱ्या फळगळवरील उपाययोजना

 संत्रा-मोसंबी-लिंबू 

पीक संरक्षण

👉🏽 फळांवरील फायटोप्थोरा तपकिरी कूज नियंत्रणासाठी, फोसेटिल एएल २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ४० दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी.

👉🏽 मूळकूज होत असलेल्या बगीच्यात मेफेनोक्झाम एम किंवा फोसेटिल एएल २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाची झाडाच्या आकारमानानुसार प्रति झाड ५ ते १० लिटर द्रावणाची ४० दिवसांच्या अंतराने दोनवेळा आळवणी व फवारणी करावी.

👉🏽 कॉलेटोट्रीकम आणि बोट्रीओडिप्लोडिया बुरशी प्रभावित झाडांवर कार्बेन्डाझिम किंवा थायोफनेट मिथाइल १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी.

👉🏽 फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी ८ ते १० मिथाईल युजेनॉल कामगंध सापळे लावावेत. दर १५ ते २० दिवसांच्या अंतराने आमिष (मिथाईल युजेनॉल) बदलावे.

👉🏽 फळांच्या परिपक्वतेच्या अवस्थेत फळांचा रंग बदलाच्या वेळी फळ रस शोषण करणाऱ्या पतंगाच्या व्यवस्थापनासाठी कडूलिंबाचे तेल १० मि.लि. किंवा पेट्रोलिअम फवारणी तेल (खनिज तेल) २० मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे १०-१५ दिवसांच्या अंतराने, फळांची तोडणी होईपर्यंत फवारणी करावी. बगीच्यात झाडाखाली पडलेली फळे एकत्र करून कंपोस्ट खड्ड्यात पुरून टाकावीत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post