उन्हाळ्यातील संत्रा-मोसंबी-लिंबू बागेसाठी पाणी व्यवस्थापण

 संत्रा-मोसंबी-लिंबू 

संत्रा-मोसंबी-लिंबू  बागेसाठी पाणी व्यवस्थापण

संत्रा व मोसंबी बागेस एक वर्ष वयाच्या झाडाला १७ लिटर पाणी/ दिवस/ झाड द्यावे. दोन वर्षे वयाच्या झाडाला ३४ लिटर पाणी/ दिवस/ झाड, तीन वर्षे वयाच्या झाडाला ५१ लिटर पाणी/ दिवस/ झाड द्यावे. चार वर्षे वयाच्या झाडाला ७४ लिटर पाणी, तर ८ वर्षे वयाच्या झाडाला १८८ लिटर/ दिवस/ झाड व १० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडांना २३५ लिटर/ दिवस/ झाड पाणी द्यावे. लिंबू बागेस एक वर्ष वयाच्या झाडाला ११ लिटर पाणी/ दिवस/ झाड, दोन वर्षे वयाच्या झाडाला १७ लिटर, ३ वर्षे वयाच्या झाडाला २५ लिटर, ४ वर्षे वयाच्या झाडाला ३६ लिटर पाणी प्रति दिन प्रति झाड द्यावे. पाच वर्षांच्या झाडाला ४२ लिटर/ दिवस/ झाड, ८ वर्षांच्या झाडाला ७३ लिटर/ दिवस/ झाड आणि १० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडांना १०८ लिटर/ दिवस/ झाड द्यावे. पाणीटंचाईच्या काळात झाडाभोवती काळी पॉलीथीन (१०० मायक्रॉन जाडी) पसरून घ्यावी. आच्छादनामुळे जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावतो. आच्छादनासाठी शेतीतील निरूपयोगी सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थ वापरता येतात. यामध्ये प्रामुख्याने डवरीचे सड, तुराट्या, वाळलेले गवत, गव्हाचे काड, उसाचे पाचट, लाकडाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचा थर झाडाच्या सभोवती पसरावा.

---------------------------------------------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post