संत्रा-मोसंबी-लिंबू
नवीन संत्रा, मोसंबी बागेच्या लागवडीसाठी जमिनीची निवड करताना जमिनीची खोली कमीत कमी एक मीटर असावी. मात्र एक मीटरपेक्षा कमी खोली असलेल्या जमिनीमध्ये संत्रा, मोसंबी लागवड केल्यास योग्य प्रकारे खते व मशागतीचा अवलंब करावा लागतो. निवडलेली जमीन ही पाण्याचा योग्य निचरा होणारी, ६० टक्क्यांपेक्षा कमी चिकण माती असणारी, ८.३ पेक्षा कमी सामू (पीएच) असणारी, १२ टक्क्यांपेक्षा कमी मुक्त चुनखडीचे प्रमाण असणारी आणि स्थिर पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक असलेल्या जमिनीची निवड करावी. निवड केलेल्या जमिनीमध्ये मे महिन्यामध्ये ६ x ६ मीटर अंतरावर ७५ x ७५ x ७५ सें.मी. आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत. खोदलेल्या खड्ड्यामध्ये सूर्यप्रकाश पडून उष्णतेने निर्जंतुकीकरण होते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.