हळद
हळद पिकामध्ये ठिबक सिंचनद्वारे लागवडीनंतर ३ ते ४ आठवडे (लागवड ते उगवण) या अवस्थेमध्ये दोन समान हप्त्यांमध्ये ३ किलो नत्र, ३ किलो स्फुरद व १.५ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खतांद्वारे देण्यासाठी ४.९ किलो १२:६१:००, ५.२ किलो युरीया व ३ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा द्यावे.
लागवडीनंतर ५ ते १४ आठवडे (शाखीय वाढ) या अवस्थेमध्ये दहा समान हप्त्यांमध्ये ३ किलो नत्र, ०.९ किलो स्फुरद व ०.६ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खतांद्वारे देण्यासाठी १.५ किलो १२:६१:००, ६ किलो युरीया व १.२ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा द्यावे.