आंबा
नवीन आंबा लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफसफाई करून घ्यावी. सघन पद्धतीने लागवडीसाठी ५ x ५ मीटर अंतरावर १ x १ x १ मीटर आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. खड्डे चांगली माती, चांगले कुजलेले शेणखत तीन ते चार घमेली आणि सिंगल सुपर फॉस्फेट ३ किलो या मिश्रणाने भरून तयार ठेवावेत.