केळी
रोग व्यवस्थापन
⭕️करपा (सिगाटोका)
👉बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा योग्य निचरा करावा.
👉ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना झाडाच्या वाढीची अवस्था, हवामान आणि जमिनीच्या मगदूरानुसार पाण्याची मात्रा ठरवावी.
👉कळी बाग आणि परिसर स्वच्छ आणि तणमुक्त ठेवावा.
👉मख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमितपणे कापावीत.
👉अन्नद्रव्यांची शिफारशीत मात्रा (नत्र २०० ग्रॅम, स्फुरद ६० ग्रॅम आणि पालाश २०० ग्रॅम प्रतिझाड) वेळापत्रकानुसार द्यावी.
👉रोगग्रस्त पानाचा भाग किंवा रोगग्रस्त पान जाळून नष्ट करावेत.
👉कळी पिकाची सतत लागवड करणे टाळावे. पिकाची फेरपालट करावी.
👉खोडवा घेण्याचे टाळावे.
👉पराथमिक लक्षणे दिसताच, कॉपर ऑक्झीक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक स्टिकर १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. प्रादुर्भाव वाढल्यास, प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक स्टिकर १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारावे. गरजेनुसार पुढील फवारणी बुरशीनाशक बदलून करावी.
⭕️ कंद कुजव्या
👉लागवडीसाठी निरोगी कंद वापरावे.
👉लागवडीपूर्वी कंदावर प्रक्रिया करावी. कॉपर ऑक्सिक्लोराईड ४ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ०.३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात कंद ३० मिनिटे बुडवावेत.
👉चांगले कुजलेले शेणखत प्रतिझाड १० किलो वापरावे.
👉लागवडीच्या वेळी जमिनीतून ब्लिचींग भुकटी ६ ग्रॅम प्रतिझाड द्यावी. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने चारवेळा हीच प्रक्रिया करावी.
👉रोगट झाडे कंदासह उपटून नष्ट करावीत.
👉बागेत रोगग्रस्त झाडाचे कोणतेही अवशेष ठेवू नयेत. बाग स्वच्छ करावी.
👉रोगग्रस्त बागेत पुन्हा केळी पिकाची लागवड करू नये. पिकाची फेरपालट करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.