कापूस पिक सल्ला |कपाशी उपटणी |

 कापूस

कापूस वेचणी पूर्ण झाल्यानंतर, कापसाचे झाड (सड) हातानेच उपटतात. हे काम खाली वाकून करावे लागते. त्यामुळे कंबरदुखी, पाठदुखीचे आजार संभवतात. तसेच झाड ओढताना हाताला इजा होण्याची शक्यता असते. कापूस सड उपटणी चिमट्याचा वापर केल्यास सड सहजपणे, कमी श्रमात उपटते. याला एक जबडा असून, त्याचा आतील भाग आहे. पारंपारिक सड उपटणी चिमट्याच्या खालील दोन्ही पाती सरळ आहेत, त्यामुळे सड निसटते. यासाठी शक्ती विभाग, व.ना.म.कृ.वि.,

परभणी येथे स��धारित सड उपटणी चिमट्याची रचना करण्यात आली आहे. जबड्यामध्ये सड पकडून हँडल स्वतःकडे ओढले असता, कॅमसारखी लिव्हरची (हँडलची) हालचाल होऊन सड उपटले जाते व जबड्यात खाच असल्यामुळे सड घट्ट पकडली जाते. अशा प्रकारे कमी कष्ट लागून यंत्राद्वारे सहजपणे काम पार पडते. चिमट्याचे वजन ५.२५ किलो आहे. एक महिला एका तासामध्ये ५० वर्गमीटर क्षेत्रावरील सड काढू शकते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post