भात वाळविण्याच्या पद्धती

 भात

भात वाळविण्याच्या पद्धती

कापणीवेळी दाण्यामध्ये २०-२२ टक्के आर्द्रता असते. ती वाळवून १२-१४ टक्क्यांपर्यंत खाली आणणे आवश्यक असते. भात पीक व्यवस्थित वाळवले नाही, तर त्यातून कणीचे प्रमाण वाढते. आख्खा तांदूळ कमी मिळाल्याने बाजारात दर कमी मिळतो. त्यामुळे काढणीनंतरच्या प्रक्रियांकडे लक्ष दिल्यास धान्याची प्रत, बियाणे म्हणून वापरक्षमता टिकवली जाते. तसेच भरडल्यानंतर मिळणाऱ्या तांदळामध्येही पोषकता टिकून राहते. या भाताला बाजारात उत्तम दर मिळतो. 

🌾धान्य वाळविण्याच्या पद्धती 

सर्यप्रकाशात धान्य वाळविणे- ही सर्वाधिक वापरली जाणारी लोकप्रिय आणि स्वस्त पद्धत आहे. मोकळ्या जागेत जमिनीवर किंवा ताडपत्री/ प्लॅस्टिक कागद/ प्लॅस्टिक शिवलेले तळवट/ सतरंजी यावर धान्य उन्हात पसरविले जाते. सर्वसाधारणपणे ३-५ सें.मी. उंचीचा थर ठेवावा. धान्य सतत उलटून-पालटून वरखाली करावे. यामुळे वाळण्याची प्रक्रिया वेगाने होते. या धान्याचे पक्षी, जनावरे व अन्य सजीवांपासून संरक्षणासाठी राखण करावी लागते. या पद्धतीस वेळही जास्त लागतो. वाळविल्यानंतरची आर्द्रता १२-१४ टक्के असावी. 

यांत्रिक वाळवण- खरीप भातपिकाच्या कापणीवेळी किंवा कापणीनंतर लगेचच पाऊस पडताना आढळतो. बदलत्या हवामानामुळे ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण वाढलेले आढळते. तयार पीक कापणीवेळी भिजते. भिजलेले पीक साठविणे अयोग्य ठरते. त्यातच पावसाचा काळ वाढला आणि उन्हाचे प्रमाण कमी झाल्यास धान्य वाळवणे अवघड ठरते. म्हणून यांत्रिक पद्धतीने धान्य वाळवणे उपयुक्त ठरते. या पद्धतीत गरम हवेचा वापर धान्य वाळविण्यासाठी करतात. यामध्ये दोन प्रकारची यंत्रे वापरली जातात. 

1️⃣ बच पद्धत वाळवण यंत्र 

2️⃣सतत प्रवाही पद्धतीचे वाळवण यंत्र

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post