द्राक्ष
द्राक्ष बागेतील घडकूज
🍇 उपाययोजना
👉शेडा पिंचिंग करणे - यावेळी वाढ झपाट्याने होत असल्यामुळे शेंडा पिचिंग करून वाढ नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते.
👉 बगलफूट काढणे - दाट कॅनॉपीकरिता घडाच्या आजूबाजूच्या बगलफुटी त्रासदायक ठरतात. पावसाळी वातावरणात बगलफुटींचा जोम जास्त असतो. तेव्हा बगलफुटी काढून पानांची गर्दी कमी करता येईल.
👉वेलीची वाढ नियंत्रणात ठेवणे - याकरिता वाढीच्या अवस्थेनुसार पालाश दोन ते तीन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारण्या कराव्या. त्यासोबतच जमिनीतून ठिबकद्वारे उपलब्धता करावी (प्रमाण: एक ते दीड किलो प्रतिएकर). नत्रयुक्त खतांच्या वापर काही दिवसांकरिता बंद करावा.
👉रोग नियंत्रण - कूज ही बऱ्यापैकी रोगाच्या प्रादुर्भावाशी संबंधित असताना दिसून येते. त्यामुळे रोग नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे. यावेळी आंतरप्रवाही बुरशीनाशकांपेक्षा स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी करून त्यानंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करावी. बागेतील रोगनियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून मांजरी वाईनगार्ड २ मि.लि. प्रतिलिटर पाणी किंवा ड्रेचिंगद्वारे मांजरी ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकर वापर करावा. सुडोमोनास किंवा बॅसिलस प्रत्येकी ५ मि.लि. प्रतिलिटर पाणी यांचा शिफारशीप्रमाणे वापर करावा.
👉 बागेत कोरडे वातावरण ठेवणे - पाऊस थांबताच किंवा दव पडलेल्या परिस्थितीत ब्लोअर फिरवून पाणी घडाच्या बाहेर निघेल याची काळजी घ्यावी. जास्त पाऊस झालेल्या परिस्थितीत लगेच ओलांडे हलवून घ्यावेत. यामुळे घडामध्ये पाणी साचणार नाही. रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.