आले पिकातील पर्णीय रोग नियंत्रण

 आले 

पर्णीय रोग नियंत्रण 

⭕️ पानावरील ठिपके 

हा रोग ‘फायलोस्टीका झिन्जीबेरी’ या रोगकारक बुरशीमुळे होतो. ढगाळ वातावरण सतत राहिल्यास आणि आर्द्रता ९० टक्क्यांच्या वर राहिल्यास रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. रोगाची सुरवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानांवर पसरतो. पानावर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात. 

🛡️ उपाययोजना 

मॅन्कोझेब २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा एक टक्का बोर्डो मिश्रण तयार करून फवारणी करावी. हवामानाच्या परिस्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात १५ ते २० दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post