आले पिक | आठवडी सल्ला | खत नियोजन

 आले 


आले पिकामध्ये अधिक उत्पादनवाढ व जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी, ठिबक सिंचनद्वारे लागवडीनंतर ५ ते १४ आठवडे (शाखीय वाढ) या अवस्थेमध्ये १० समान हप्त्यांमध्ये १.८ किलो नत्र, ०.६८ किलो स्फुरद व ०.४५ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात आवश्यकता असते. ही खतमात्रा विद्राव्य खतांद्वारे देण्यासाठी १ किलो १२-६१-००, ३.६ किलो युरीया व १ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा प्रति एकर द्यावे. 

लागवडीनंतर १५ ते २६ आठवडे (कंद वाढीची सुरुवात) या अवस्थेमध्ये १२ समान हप्त्यांमध्ये ०.७५ किलो नत्र, ०.५६ किलो स्फुरद व ०.५६ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात आवश्यकता असते.  ही खतमात्रा विद्राव्य खतांद्वारे देण्यासाठी १ किलो १२-६१-००, १.४ किलो युरीया व १ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा प्रति एकर द्यावे.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post