आले
पानावरील ठिपके (रोगकारक बुरशी : फायलोस्टीका झिन्जीबेरी) ढगाळ वातावरण सतत राहिल्यास आणि आर्द्रता ९० टक्क्यांच्या वरती राहिल्यास रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. रोगाची सुरवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानांवर पसरतो. पानावर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात.
नियंत्रण - मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा एक टक्का बोर्डो मिश्रण तयार करून फवारणी करावी. हवामानाच्या परिस्थितीनुसार १५ ते २० दिवसांच्या अंतराने पुढील फवारणी करावी. फवारणीच्या द्रावणात स्प्रेडर स्टिकरचा वापर करावा.
हळद कंदकूज,करपा व आले पानांवरील ठिपके, कंदकूज रोग नियंत्रण.
हळद
करपा (रोगकारक बुरशी : कोलेटोट्रिकम कॅपसिसी अथवा टॅफ्रिना मॅक्युलन्स) सकाळी पडणारे धुके व दव हे वातावरण रोगाच्या प्रादुर्भावास अनुकूल असते. ‘कॉलेटोट्रिकम कॅपसिसी’ बुरशीमुळे पानावर अंडाकृती ठिपके पडतात. तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते. ‘टॅफ्रिना मॅक्युलन्स’ या बुरशीमुळे पानावर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके आढळतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. लागवडीपासून सात महिन्यांपूर्वी पाने करपल्यास उत्पादनामध्ये मोठी घट येते.