पूर्वहंगामी ऊस
लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांत उसास फुटवे येण्यास सुरवात होते. फुटव्यांची वाढ अधिक जोमदार व्हावी, म्हणून नत्र खताची ४० टक्के मात्रा (एकरी ५४ किलो नत्र - ११८ किलो नीमकोटेड युरिया) द्यावी. पीक १२ ते १४ आठवड्यांचे झाल्यानंतर उसास कांड्या सुटण्यास मदत होते. त्या वेळी नत्रयुक्त खताचा तिसरा हप्ता म्हणजे शिफारशीच्या १० टक्के नत्राची मात्रा (एकरी १४ किलो नत्र - ३० किलो नीमकोटेड युरिया) द्यावी. को-८६०३२ ही जात रासायनिक खताला जास्त प्रतिसाद देते. त्यामुळे या जातीसाठी २५ टक्के रासायनिक खतांची मात्रा अतिरिक्त वापरावी.
पूर्वहंगामी ऊस खत व्यवस्थापन,आडसाली ऊस पाणी नियोजन,खोडवा ऊस पूर्वनियोजन.
खोडवा ऊस
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर माती परिक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मँगेनीज सल्फेट व २ किलो बोरॅक्स ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते १:१० या प्रमाणात सेंद्रिय खतांमध्ये मिसळून ४ ते ५ दिवस सावलीत मुरवून वापरावीत. खोडवा ठेवल्यानंतर ६० दिवसांनी मल्टी मॅक्रोन्यूट्रीयंट (नत्र ८ %, स्फुरद ८ %, पालाश ८ %) आणि मल्टि मायक्रोन्यूट्रीयंट (ग्रेड - २ : लोह २.५ %, मँगेनीज १%, जस्त ३%, मॉलीब्डेनम ०.१ %, बोरॉन ०.५ %) या द्रवरूप खतांची प्रत्येकी २ लिटर २०० लिटर पाणी आणि ९० दिवसांनी प्रत्येकी ३ लिटर ३०० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.