सोयाबीन
पाऊस, ढगाळ वातावरण व आर्द्रता यांमुळे उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावर शेंगा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्या नियंत्रणासाठी टेब्यूकोनॅझोल (२५.९ इसी) १.२५ ते १.५ मिलि किंवा टेब्यूकोनॅझोल (१०%) + सल्फर (६५% डब्ल्यूजी) हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकता वाटल्यास दहा दिवसांनी परत एकदा फवारणी करावी. उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी) ०.७ मिलि किंवा फ्ल्युबेंडिअमाईड (३९.३५ एससी) ०.२ मिलि किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (१.९ टक्के) ०.९ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
तूर
पीक वाढीच्या अवस्थेत, फुलोऱ्याच्या अवस्थेत आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे किंवा ठिबक सिंचनाने ५० टक्के बाष्पीभवनानंतर पाणी द्यावे. पिकांस फुले येण्याच्या अवस्थेत किंवा शेंगा लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास, २० ग्रॅम युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) किंवा डी.ए.पी. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.