मका पिक नियोजन तसेच भात पिकातील रासायनिक तण नियंत्रण.


मका
मका पिकाची पाने रुंद व लांब असल्यामुळे बाष्पीभवन क्रियेद्वारे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जाते. परिणामी मका पिकास पाण्याची गरज जास्त असते. खरीप हंगामात निश्चित आणि विस्तृत पावसाचे प्रमाण असणाऱ्या भागात मका पीक जिरायतीखाली घेता येते. मका पीक पाण्याचा ताणास संपूर्ण पीक कालावधीत संवेदनशील आहे. त्यातही खालील संवेदनशील अवस्थांमध्ये संरक्षित पाणी द्यावे. पेरणीनंतर २० ते ४० दिवसांनी (पिकाची शाकीय अवस्था) पेरणीनंतर ४० ते ६० दिवसांनी (पीक फुलोऱ्यात असताना) पेरणीनंतर ७० ते ८० दिवस (दाणे भरण्याचे वेळी)


कृषी सल्ला :- जनावरांच्या आहारात चारा पिकाचे महत्व


भात पिकातील रासायनिक तण नियंत्रणभात
भात पिकातील रासायनिक तण नियंत्रण (प्रमाण प्रति १० लिटर पाणी) 

-पेंडीमिथॅलीन (३० ईसी) ५० मि.लि. - रोवणीनंतर ४ ते ७ दिवसांत
-प्रेटिलॅक्लोर (३० इडब्ल्यू) अधिक पायरॅझोसल्फुरॉन इथाईल ५० ते ६० मि.लि. – उगवणपूर्व पेरीव भातासाठी -अझीमसल्फुरॉन (५० इसी) २ ते ३ ग्रॅम - रोवणी तसेच पेरीव भात पिकात लागवडीनंतर २५ दिवसांनी उगवणपश्‍चात फवारणी
-बिसपायरीबॅक सोडीयम (१० एससी) ६ ते ७ मि.लि. - रोपवाटीकेत १० ते १२ दिवसांनी उगवणपश्‍चात किंवा रोवणीनंतर १० ते १५ दिवसांनी फवारणी
-इथॉक्सोसल्फुरॉन (१५ डब्ल्यूडीसी) १.६६ ते २ ग्रॅम - उगवणपश्‍चात
-पायरॅझोसल्फुरॉन इथाईल (१० डब्ल्यूपी) २ ग्रॅम - रोवणीनंतर ४ ते ७ दिवसांत उगवणपश्‍चात
-मेटसल्फ्युरॉन मिथाईल (१०%) अधिक क्‍लोरीम्युरॉन इथाईल (१०% डब्ल्यूपी) ०.३५ ग्रॅम - उगवणपूर्व रोवणीनंतर ३ दिवसांपर्यंत फवारणी.


कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लीक करा .

Post a Comment (0)
Previous Post Next Post